स्वातंत्र्यता दिवस उत्साहाने साजरा!

 



लोकमान्य मेडिकल फाऊंडेशन,
लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था 
आदर्श माता तान्हुबाई नागरी सहकारी पतसंस्था व सूर्या HP GAS एजन्सी यांच्या संयुक्तउपक्रमाने भारत देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदीन आज फलटण येथील लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था च्या इमारती मध्ये पार पडला.
कार्यक्रमाचे  यांच्या हस्ते ध्वजारोहण व पूजन श्री. संपतराव शिंदे सर व सौ. शबाना पठाण ( सुवर्णस्पर्श फाऊंडेशन ) यांच्या हस्ते करण्यात आले.
दशरथ फुले ( मा. अध्यक्ष आ.भा.म. फुले समता परिषद),जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष श्री. गणेश मदने,लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थाचे संचालक श्री. बनसोडे साहेब, श्री.बापूसाहेब काशिद,लोकमत वृत्तपत्राचे प्रमुख पत्रकार श्री.  विकास शिंदे, इत्यादी मान्यवर हे व्यासपीठावर हजर होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितांनी डॉ.बी.के. यादव यांचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष झाल्याबद्दल सत्कार करून आपले आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले. 
यावेळी डॉ.बी.के.यादव यांनी " समता, बंधुता,सामाजीक न्याय व स्वतंत्र हे देश विकासासाठी किती महत्त्वाचे आहे हे सांगितले.तसेच त्यांच्या संस्थेने आजपर्यंत किती चढ उतार सोसत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे ते सांगितले या सगळ्यांचे श्रेय त्यांनी आपल्या संस्थेतील सर्व कर्मचार्‍यांना आणि संस्थेचे C.E.O. अमोल जगताप व श्री.  राजेंद्र घनवट यांना दिले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणुन श्री.जी.एम. जाधवसर, श्री.तानाजी जगताप यांची भाषणे झाली.  तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांचा सत्कार सौ. सुनेत्रा जगताप यांनी केला. या कार्यक्रमाला तालुक्यातील श्री.पोपट डांगे,सचिन माने,शंकर आहिवळे,शेख सर,श्री.घनवट, जय मल्हार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते,  सूर्या GAS एजन्सी चे सर्व कर्मचारी, रोहन क्षीरसागर, श्री.चांडक, प्रकाश जाधव, विठ्ठल भोंग भोंगळे सर, श्री. महात,शीतल भोसले,सौ.शाबाना इनामदार,सौ. सपना भोसले,कु.आकांक्षा मिरेकर,कु.सेजल सस्ते,कु. अदिती मोरे, समृद्धी मोरे इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. अमोल जगताप ( C.E.O. लोकमान्य उद्योग समूह) यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे नियोजन डॉ.शेखर यादव व श्री. राजेंद्र घनवट यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

अखिल भारतीय समता परिषदेची बैठक संपन्न !