अखिल भारतीय समता परिषदेची बैठक संपन्न !
अखिल भारतीय समता परिषदेची बैठक संपन्न !
नांदवळ,ता.कोरेगांव येथील निवृत्त पोलीस अधिकारी श्री.रामचंद रासकर यांच्या निवास्थानी आज दि. २१/०८/२०२५ रोजी अखिल भारतीय समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थान श्री. शाहीर प्रकाश फरांदे यांनी भूषवले.यावेळी समता परिषदेचे उदयमुख जिल्हाध्यक्ष डॉ. बी.के.यादव. व माजी अध्यक्ष श्री.राजेंद्र नेवसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोरेगांव तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्वांच्या बहुमोल विचारांती श्री. दिपकराव गार्डे ( पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव ) यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाली तर श्री.राजेंद्र कोरडे यांची जिल्हाउपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
मा. छगन भुजबळ व समता परिषद यांचे कार्य OBC आणि अल्पसंख्याक समाजासाठी किती मोलाचे आहे आणि भविष्यात आणखीन वेगाने कसे होणार यावर माजी अध्यक्ष श्री. राजेंद्र नेवसे यांनी प्रकाश टाकला. तसेच यावेळी त्यांनी डॉ. बी.के.यादव यांचे अखिल भारतीय समता परिषद सातारा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करत भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ.बी.के.यादव यांनी या शुभेच्छांचा स्वीकार करत उपस्थित सर्व समता सैनिकांना मागर्दर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले कि " महात्मा फुले यांचा समतेचा संदेश व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला बहाल केलेले संविधानातील हक्क हे समाजातील सर्व उपेक्षित,वंचित,व महिला वर्गापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि हेच महान कार्य आपल्याला करायचे आहे. या महान पुरुषांचे विचार फक्त पुस्तकात राहता कामा नये आता वेळ आली आहे ते विचार जगण्याची . समाजातील सर्व OBC,ST,NT,VJNT वर्गातील विध्यर्थी आणि बेरोजगार युवकांसाठी शासनानांचे जे उपयुक्त उपक्रम आहेत ते आपल्याला समता परिषदेच्या माध्यमातून या युवकांच्या लाभासाठी राबवायचे आहेत .भविष्यात जर त्यांना उच्च अधिकारी म्हणून पाहायचं असेल तर त्यांना समता परिषदेचे संपूर्ण योगदान राहील. यासाठी सर्व उपेक्षित वर्गाला संघटित करण्याचे कार्य समता परिषद अविरतपणे करत होती आणि करत राहणार आहे.
बैठकी नंतर आभार प्रदर्शन श्री. संजय करपे यांनी केले. या बैठकीत श्री.परमेश्वर गार्डी,श्री.रमेश कुदळे,श्री.दिपक गार्डी,श्री.शंकर शिंदे,श्री.बाबासाहेब गार्डी,श्री.नितीन नेवळे,श्री.संपत नेवसे,श्री.उद्धव कर्णे,श्री.सोपान नेवसे,श्री.प्रशांत कोरडे,श्री.धनंजय पवार,श्री.राजेंद्र कोरडे,श्री.राजेंद्र पवार,श्री.कुमार नेवसे,श्री.विकास नेवसे,संजय नेवसे,नामदेव नेवसे,बाळासाहेब बोडके,दत्तात्रय रासकर,प्रकाश रासकर,अरविंद राऊत,रामचंद्र रासकर,जनार्धन रासकर इत्यादी समता सैनिकांनी उपस्थित राहून ही बैठक निर्णायक ठरवली.

Comments
Post a Comment