डॉ.बी.के. यादव यांची नुकतीच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेवर जिल्हाअध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

 डॉ.बी.के. यादव जे कापशी सारख्या छोट्या गावात जन्माला आले पण त्यांनी आज तेच गाव एका साखर कारखान्याची स्थापना करून त्या गावचे नाव पंचक्रोशीत मोठे केले.गावातील पहिला डॉक्टर म्हणून त्यांनी मान मिळवला. एका सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेल्या डॉ.बी.के. यादव यांची वाटचाल मात्र असामान्य आहे.एका लोखंडाला हत्यारात रूपांतर होताना तप्त आगीतून जावं लागत, आपल्याच्या लोखंडाच्या घनांचा घाव सोसावा लागतो तसेच सर्व प्रसंग झेलत 'डॉ.बी.के. यादव' हे यक्तीमत्त्व आज धारदार तलवारी सारखे तळपत आहे.

आपल्या वैद्यकीय व्यवसायाचा वापर फक्त आपल्या कुटुंबियांच्या गरजा भागवून एशोआरामात आपले जीवन व्यतीत करावे अशी भावना या संसारात राहूनही वैरागी माणसाला कधीच झाली नाही.आर्थिक दृष्ट्या कमजोर रुग्णांना कधी नाममात्र पैश्यात तर बऱ्याचदा मोफत उपचार केले. त्याकाळातील प्रतिष्ठित डॉक्तरांचा नावलौकिक असताना सुद्धा या सुवर्णपदक विजेत्या डॉक्टरने आपले बुद्धी कौशल्य आणि सामाजिक कर्तव्य दाखवत स्वतःचे नाव प्रकाशित केले. यासाठी त्यांनी लोकमान्य मेडिकल फाउंडेशनची स्थापना केली.आपल्या वैद्यकीय शिक्षणात श्रीमंत लक्ष्मीदेवी मालोजीराजे नाईक निंबाळकर (राणी साहेब) यांचा मोलाचा वाटा आहे हे ते आजही जाहीररित्या सांगत असतात. राणी साहेबाच्या मदतीची जाण म्हणून त्यांनी त्यांच्याच नावाचा कायम स्वरूपी मोफत दवाखाना कापशी या त्यांच्या जन्मस्थळी सुरु केला आहे आणि ते स्वतः त्याठिकाणी मोफत सेवा देण्यासाठी कार्य करत आहेत.

स्वकष्टाचा पैसा जनतेच्या हितासाठी उपयोगात यावा म्हणून त्यांनी 'लोकमान्य उद्योग समूहाची ' स्थापना केली. या समुहाअंतर्गत त्यांनी लोकमान्य दूध संघ,लोकमान्य शिक्षण संस्था,लोकमान्य नागरी पतसंस्था ( १५ शाखा ) सुरु करून तालुक्यातील अनेक लोकांना रोजगार निर्माण केला तसेच तालुक्यातील आर्थिक उत्त्पन्न वाढवण्याची संधी निर्माण केली. आपल्या सामाजिक कार्याचा आवाका वाढावा,सामान्य जनतेला आर्थिक,शारीरिक,मानसिक व बौद्धिक स्वतंत्र मिळावे म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला परंतु सामान्य माणूस जेव्हा देवपदाला पोहचतो तेव्हा देवदेखील आपल्या अस्तित्त्वाचा विचार करतो तिथं मनुष्यजातीच काय बोलायचं? समाजातील डॉ.बी.के. यादव यांच्या आदरयुक्त निर्माण होत असलेलं साम्राज्य हे इतर राजकीय नेत्यांना पचनी पडले नाही तेव्हा राजकारणाचा वापर करून निरोगी समाज निर्माण करणाऱ्या डॉक्टरलाच रोगी बनवले.ज्या व्यक्तीने महात्मा फुलेंच्या विचारांची फुले वाटली त्यांच्याच हॉस्पिटलवर दगडांचा वर्षाव केला.

कस्तुरीचा सुगंध कधी लपत नाही,डॉ.बी.के. यादव यांच्या गुणांची,अनुभवांची व सामाजिक कार्याची दखल खुद्द मा.ना.श्री.छगन भुजबळ साहेब यांनी घेतली.

मा.खा. समीरभाऊ भुजबळ यांनी स्वतः डॉ.बी.के. यादव यांची नियुक्ती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेवर जिल्हाअध्यक्ष म्हणून केली.

जिल्यातील तमाम जनतेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. योग्य व्यक्तीची निवड योग्य पदासाठी आणि योग्य वेळी झाली हेच वाक्य सर्वांच्या मुखी आहे. लोकं निखाऱ्याची राख होण्याची वाट पाहत होते पण,राख होण्याआधीच यातून फिनिक्स पक्षी बाहेर पडला तो म्हणजेच डॉ.बी.के. यादव !


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यता दिवस उत्साहाने साजरा!

अखिल भारतीय समता परिषदेची बैठक संपन्न !