Followers









 आज fb वर एका तरुणीची पोस्ट वाचली.....एक उदास भाव चेहर्‍यावर घेऊन तीचा फोटो होता आणि पोस्ट होती....कालच maze insta वर अमुक अमुक एव्हडे followers झाले मी फार खुश होते ( सुंदरी चा फोटो असेल तर फेक acount che देखील मिलियन followers होतात) पुढे ती म्हणाली पण आज मी पाहिले तर त्यातील एक संख्या कमी झाली होती. तिच्यासाठी हा मानसिक धक्काच होता. 

हे एक सोशल मीडियाच उदाहरण आहे, जो तो आपल्या followers chi संख्या वाढण्यासाठी वाट्टेल ते करत आहे ( बुद्धिमत्ता वापराचे सोडून) आता या सगळ्यांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो की जर तुमचा मृत्यू झाला तर त्या संख्येतील किती लोक तुमच्या अंत्यविधीसाठी उपस्थित असतील????? जे उपस्थित राहणार आहेत त्यांना तुम्ही वेळ न देता तुमचे नकली followers वाढत आहात, जेव्हढी attachment सोशल मीडिया सोबत आहे तेव्हडीच attachment आपल्या अवतीभवतीच्या,नातेवाईकांच्या मित्रांच्या,आई वडलांच्या सोबत ठेवा...हेच तुमचे खरे शेवटपर्यंत साथ देणारे followers ♥️ 

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यता दिवस उत्साहाने साजरा!

अखिल भारतीय समता परिषदेची बैठक संपन्न !