सत्य क्रांती दर्शन youtube chanel
आपण एक समाजाचा भाग आहोत आणि समाज हा आपल्या आयुष्यातील एक भाग आहे. अनेक समाजकारणी लोक अनेक मार्गाने सामाजिक काम करून समाजातील वर्गाला प्रबोधन करत असतात. सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. सकाळच्या प्रहर सुरू होतो तोच खरा या सोशल मेडिया पासून आणि रात्र देखील शांत होते ते सोशल मेडिया बंद केल्या नंतरच. "सत्य क्रांती दर्शन" हा youtube chanel सुरू करण्याचा हेतू हाच की इतके प्रभावी माध्यम वापरून समाज जागृती करू शकु !
या chanel च्या माध्यामातून अनेक महान ऐतिहासिक समाज जागृती करून गेलेल्या पुण्य आत्म्याची ओळख तशीच ठेऊन त्यांच्या आयुष्यातील घटनांचा, अनुभवांचा, उपयोग सध्याच्या परिस्थितीत कसा करता येईल हा विचार करून लघुपट तयार करत आहोत. डॉ. बी.के. यादव यांच्या संकल्पनेतून या chanel ची निर्मिती झाली आहे. मुळातच अभ्यासू बुद्धिमत्ता असलेले डॉ. बी.के. यादव यांच्या सामाजिक, राजकीय, वैद्यकिय अनुभव हा प्रतेक कलाकृतीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे, या निर्मिती मध्ये त्यांना डॉ. अमित मोरे यांच्या लेखनाची व दिग्दर्शनाची साथ भेटत आहे.
समाजप्रबोधन हे चित्रपट निर्मितीतून जास्ती प्रभावी ठरू शकते हे त्यांनी आजवर निर्मिती केलेल्या शाई व परिवर्तन या दोन लघुपटाने दाखवून दिले आहे. Youtube वर अल्पावधीतच या दोन्ही लघुपटला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. तरी सर्व समाज बांधवाना एक विनंती आहे की खालील दिलेल्या लिंक वर जाऊन त्यांच्या सत्य क्रांती दर्शन या चॅनेलला subscribe करून सामाजिक कलाकृतीला मान द्यावा.
https://www.youtube.com/@sathyakrantidarshsn

Comments
Post a Comment