Posts

Showing posts from August, 2025

अखिल भारतीय समता परिषदेची बैठक संपन्न !

Image
  अखिल भारतीय समता परिषदेची बैठक संपन्न ! नांदवळ,ता.कोरेगांव येथील निवृत्त पोलीस अधिकारी श्री.रामचंद रासकर यांच्या निवास्थानी आज दि. २१/०८/२०२५ रोजी अखिल भारतीय समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थान श्री. शाहीर प्रकाश फरांदे यांनी भूषवले.यावेळी समता परिषदेचे उदयमुख जिल्हाध्यक्ष डॉ. बी.के.यादव. व माजी अध्यक्ष श्री.राजेंद्र नेवसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोरेगांव तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्वांच्या बहुमोल विचारांती श्री. दिपकराव गार्डे ( पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव ) यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाली तर श्री.राजेंद्र कोरडे यांची जिल्हाउपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मा. छगन भुजबळ व समता परिषद यांचे कार्य OBC आणि अल्पसंख्याक समाजासाठी किती मोलाचे आहे आणि भविष्यात आणखीन वेगाने कसे होणार यावर माजी अध्यक्ष श्री. राजेंद्र नेवसे यांनी प्रकाश टाकला. तसेच यावेळी त्यांनी डॉ. बी.के.यादव यांचे अखिल भारतीय समता परिषद सातारा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करत भविष्यातील का...
Image
 सध्या समस्त समाज जातीचे लेबल चिटकवून,धर्माचा मुखवटा घालून मिरवत आहे. माणसाने माणसात माणूसपण शोधणे थांबवलेले आहे तो आता फक्त पाहतोय ती जात...! तो पाहतोय धर्म,तो पाहतोय फक्त भाषा...,प्रेम ही ईश्वराची देणगी आहे. निव्वळ प्रेमानेच माणूस माणसात राहणार आहे, घरातील एकोपा,नात्यातील एकोपा,समाजातील, देशातील जगातील एकोपा हा केवळ आणि केवळ या प्रेमामुळेच शक्य आहे हे तो विसरला आहे.... याची जाण करून देण्याचा प्रयत्न म्हणजे मणी रत्नम यांचा 1995 साली प्रदर्शित झालेला बॉम्बे हा चित्रपट. चित्रपट संपूर्ण देशातील जनतेने डोक्यावर घेतला खरा पण मनात उतरवून नाही घेतला याचीच खंत...

Followers

Image
 आज fb वर एका तरुणीची पोस्ट वाचली.....एक उदास भाव चेहर्‍यावर घेऊन तीचा फोटो होता आणि पोस्ट होती....कालच maze insta वर अमुक अमुक एव्हडे followers झाले मी फार खुश होते ( सुंदरी चा फोटो असेल तर फेक acount che देखील मिलियन followers होतात) पुढे ती म्हणाली पण आज मी पाहिले तर त्यातील एक संख्या कमी झाली होती. तिच्यासाठी हा मानसिक धक्काच होता.  हे एक सोशल मीडियाच उदाहरण आहे, जो तो आपल्या followers chi संख्या वाढण्यासाठी वाट्टेल ते करत आहे ( बुद्धिमत्ता वापराचे सोडून) आता या सगळ्यांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो की जर तुमचा मृत्यू झाला तर त्या संख्येतील किती लोक तुमच्या अंत्यविधीसाठी उपस्थित असतील????? जे उपस्थित राहणार आहेत त्यांना तुम्ही वेळ न देता तुमचे नकली followers वाढत आहात, जेव्हढी attachment सोशल मीडिया सोबत आहे तेव्हडीच attachment आपल्या अवतीभवतीच्या,नातेवाईकांच्या मित्रांच्या,आई वडलांच्या सोबत ठेवा...हेच तुमचे खरे शेवटपर्यंत साथ देणारे followers ♥️ 

स्वातंत्र्यता दिवस उत्साहाने साजरा!

Image
  लोकमान्य मेडिकल फाऊंडेशन, लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था  आदर्श माता तान्हुबाई नागरी सहकारी पतसंस्था व सूर्या HP GAS एजन्सी यांच्या संयुक्तउपक्रमाने भारत देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदीन आज फलटण येथील लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था च्या इमारती मध्ये पार पडला. कार्यक्रमाचे  यांच्या हस्ते ध्वजारोहण व पूजन श्री. संपतराव शिंदे सर व सौ. शबाना पठाण ( सुवर्णस्पर्श फाऊंडेशन ) यांच्या हस्ते करण्यात आले. दशरथ फुले ( मा. अध्यक्ष आ.भा.म. फुले समता परिषद),जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष श्री. गणेश मदने,लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थाचे संचालक श्री. बनसोडे साहेब, श्री.बापूसाहेब काशिद,लोकमत वृत्तपत्राचे प्रमुख पत्रकार श्री.  विकास शिंदे, इत्यादी मान्यवर हे व्यासपीठावर हजर होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितांनी डॉ.बी.के. यादव यांचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष झाल्याबद्दल सत्कार करून आपले आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले.  यावेळी डॉ.बी.के.यादव यांनी " समता, बंधुता,सामाजीक न्याय व स्वतंत्र हे देश विकासासाठी किती महत्त्वाचे आहे हे सांगितले.तसेच त्यांच्या संस्थेने आजपर्य...
Image
 डॉ.बी.के. यादव यांची नुकतीच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेवर जिल्हाअध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.  डॉ.बी.के. यादव जे कापशी सारख्या छोट्या गावात जन्माला आले पण त्यांनी आज तेच गाव एका साखर कारखान्याची स्थापना करून त्या गावचे नाव पंचक्रोशीत मोठे केले.गावातील पहिला डॉक्टर म्हणून त्यांनी मान मिळवला. एका सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेल्या डॉ.बी.के. यादव यांची वाटचाल मात्र असामान्य आहे.एका लोखंडाला हत्यारात रूपांतर होताना तप्त आगीतून जावं लागत, आपल्याच्या लोखंडाच्या घनांचा घाव सोसावा लागतो तसेच सर्व प्रसंग झेलत 'डॉ.बी.के. यादव' हे यक्तीमत्त्व आज धारदार तलवारी सारखे तळपत आहे. आपल्या वैद्यकीय व्यवसायाचा वापर फक्त आपल्या कुटुंबियांच्या गरजा भागवून एशोआरामात आपले जीवन व्यतीत करावे अशी भावना या संसारात राहूनही वैरागी माणसाला कधीच झाली नाही.आर्थिक दृष्ट्या कमजोर रुग्णांना कधी नाममात्र पैश्यात तर बऱ्याचदा मोफत उपचार केले. त्याकाळातील प्रतिष्ठित डॉक्तरांचा नावलौकिक असताना सुद्धा या सुवर्णपदक विजेत्या डॉक्टरने आपले बुद्धी कौशल्य आणि सामाजिक कर्तव्य दाखवत स्वतःचे नाव प्रकाशित ...